विराटने साकारले क्यूब मोजेकने बाप्पा

Foto

विराटने साकारले क्यूब मोजेकने बाप्पा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विराट विशाल काडगावकर याने रुक्सि - क्यू मोजेक कलेतून आपली - वेगळी ओळख निर्माण केली आहे. वयाच्या अवघ्या १०व्या वर्षी रुक्सि क्यू - सोडवायला शिकलेल्या विराटने आतापर्यंत १८ क्यूब - मोजेक साकारले आहेत. विराटने साकारलेल्या - मोजेकमध्ये स्वामी समर्थ, - श्री गणेश, पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रिकेट खेळाडू विराट - कोहली, राष्ट्रीय स्वयंसेवकाचे - संघचालक डॉ. मोहन भागवत, अभिनेत्री सोनाली 田 - कुलकर्णी यांच्या सारख्या अनेक मान्यवरांचे तसेच - विविध विषयांवरील मोजेकचा समावेश आहे. विराट हा केंब्रिज शाळेत शिक्षण घेतो. प्रत्येक मोजेक साकारण्यासाठी सुमारे ६०० रुक्सि क्यू वापरले जातात. विविध रंगांच्या क्यूबची अचूक मांडणी
करून त्यातून व्यक्तींचे चेहरे आणि विविध आकृत्या साकारण्याचे काम विराट करतो. लहानपणापासूनच वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याची आवड असलेल्या विराटने रुक्सि क्यूबच्या रंगीबेरंगी विश्वाला कलात्मक रूप दिले. केवळ क्यू सोडवण्यापासून सुरू झालेला त्याचा हा प्रवास आज ६०० क्यूबच्या भव्य मोजेक कलाकृतींपर्यंत पोहोचला आहे.
कुटुंबीयांचे प्रोत्साहन
स्वतःची आवड आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर विराटने रुबिक्स क्यूबला केवळ खेळ किंवा कोडे न ठेवता एक आगळेवेगळे कलामाध्यम बनवले आहे. वयाच्या १४व्या वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणावर क्यू मोजेक साकारून विराटने आपल्या कल्पकतेला, आवडीला आणि सातत्याला एक आगळेवेगळे कलात्मक रूप दिले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions