मुंबई : अधिकरी आणि नुकतीच नागपूर पोलिस आयुक्त म्हणून बदली झालेल्या विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती केली. यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा नांगरे पाटील यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातील सहभागावरून जोरदार तोफ डागली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारासाठी संख्या कमी पडत असेल म्हणून आता आयपीएस अधिकार्यांना सोबत घेतलं आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी प्रचार करावा म्हणूनच त्यांना संघ मुख्यालयात पाठवलं आहे, असा खोचक टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
दुसरीकडे, विश्वास नांगरे पाटील यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कौतुक करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसकडून तोच व्हिडिओ आता ट्विट करण्यात आला आहे. या ट्विटवरून नांगरे पाटील यांच्यावर कडाडून प्रहार केला आहे. शासकीय सेवेत असताना अशाप्रकारे एका विशिष्ट विचारसरणीची आणि द्व्ोष पसरवणार्या संघटनेची चाटूगिरी करणे म्हणजे लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे असा हल्लाबोल केला आहे. संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले, राग दरबारी गाण्या संघाच्या दारी हजर झाले, असा टोला सुद्धा काँग्रेसकडून लगावण्यात आला आहे.
धार्मिक अजेंडा राबवणार असाल तर
पोस्टमध्ये म्हटलं आहे की, संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले, राग दरबारी गाण्या संघाच्या दारी हजर झाले! एका बाजूला भारतीय संविधानाची शपथ घेऊन, जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी अंगावर घेणार आणि दुसर्या बाजूला दिवसाढवळ्या समाजात द्व्ोष पसरवणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जाहीर स्तुती करणार...हे कसले कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी? शासकीय सेवेत असताना अशा प्रकारे एका विशिष्ट विचारसरणीची आणि द्व्ोष पसरवणार्या संघटनेची चाटूगिरी करणे म्हणजे लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे. पोलिसांचे काम समाजात कायदा व्यवस्था राखणे आहे, की अशा विद्व्ोष पसरवणार्या संघटनांचे गुणगान गाणे? संघाच्या लोकांनी दंगली घडवल्या हा इतिहास यांना माहिती नाही की काय ? आता या महाशयांची बदली नागपूरला झाली आहे. बरं झालं, ज्यांची सेवा करायची आहे, आता थेट त्यांच्याच चरणी जाऊन सेवा करण्याची संधी यांना मिळाली आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही जनतेच्या पैशावर पगार घेणारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेतलेले सरकारी नोकर आहात, देशद्रोही संघाचे स्वयंसेवक नाही. वर्दीचा गैरवापर करून जर राजकीय आणि धार्मिक अजेंडा राबवणार असाल, तर नागपुर आणि महाराष्ट्राची संविधानप्रेमी जनता हे खपवून घेणार नाही!
नेमकं काय आहे व्हायरल व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओत विश्वास नांगरे पाटील म्हणतात, ज्यांच्या जीवनात शिस्त आहे, अशा स्वयंसेवकांची संघटना म्हणजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. १९२५ मध्ये एका दूरदर्शी राष्ट्रभक्त डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी या संघटनेचा पाया रचला. गेल्यावर्षी १०० वर्षे पूर्ण झाली, याच निमित्ताने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे त्रिपाठीजी आणि हंसाजी यांनी अगदी शुद्ध हिंदीत भाषण केले, माझी हिंदी मात्र तोडमोडकी हिंदी आहे.