श्रीक्षेत्र देवगड येथे विठ्ठल भक्तीरस महोत्सवास शोभायात्रेने प्रारंभ

Foto
गोवत्स राधाकृष्ण महाराज यांचे कथा वाचन, नामघोषाने दुमदुमली नगरी
 
गंगापूर, (प्रतिनिधी) पुरुषोत्तम मासानिमित्त भूलोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्री गुरूदेवदत्त पीठ क्षेत्र देवगड येथे राजस्थान जोधपूर येथील गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद भागवत कथा सोहळ्याला भागवत ग्रंथ शोभायात्रा मिरवणूकीने व गोमातेच्या पूजनाने प्रारंभ करण्यात आला. 

यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात व भगवान दत्तात्रयांच्या नामघोषाने झालेल्या शोभायात्रा मिरवणुक प्रसंगी देवगडनगरी दुमदुमली होती. पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने आयोजित श्रीमद भागवत कथा व किर्तन सोहळ्याला विठ्ठल भक्तीरस महोत्सव असे नाव देण्यात आले आहे. 

देवगड मृदुंगाच्या शोभायात्रा प्रारंभझाला येथीलप्रांगणातूनटाळ गजरात गुरुवारी मिरवणुकीला मिरवणुकीत गोवत्स राधाकृष्ण महाराज, देवगड दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या समवेत वारकरी संप्रदायातील संत महंत कीर्तनकार प्रवचनकार पुरुष व महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

शोभायात्रेच्या प्रसंगी गो शाळेतील गोमतेचे तसेच गंगा पात्रात जाऊन गंगेचे पूजन गोवत्स राधाकृष्ण महाराज, गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भगवान दत्तात्रय व श्री समर्थ आला. सदगुरु किसनगिरी बाबांच्या समाथी मंदिरात जाऊन मूर्तीचे पूजन करण्यात आले. कथा सुरू असलेल्या ज्ञानसागर सभामंडपात शोभायात्रेचा समारोप केला. 

यावेळी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते श्रीमद भागवत ग्रंथाचे पूजन तर राधाकृष्ण महाराज यांचे संतपूजन तुळशी हार घालून करण्यात आले. कथा सोहळयाच्या प्रारंभीचवारकरी संप्रदायातीलसंत महंत मंडळी यांच्यासह युवक बालबालिका, महिला पुरुष भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

पूर्व पुण्याईने भागवत कथा श्रवण होते. भागवत कथा ही पूर्व पुण्याईने श्रवण होते या कथेच्या माध्यमातून आपणास श्रीकृष्ण भगवंताचे चरित्र कळते तर जगात कस जगावं हे गीता शिकवते तर कस मरावं हे आपल्याला भागवत शिकवते, जन्म मरणाचे साकडे कथा श्रवणाने सुटते सर्वांनी या पर्व काळातील कथा श्रवणाचा तसेचयामुळे मिळणारा बाहयव आंतरिक आनंद घेण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा असे गुरुवर्य भास्करगिरीजी यांनी यावेळी आवाहन केले.