आषाढी एकादशीनिमित्त कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे विठ्ठल-रुक्मिणी वारकरी रूप स्पर्धा उत्साहात

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : आषाढी एकादशीच्या पूर्व संध्याकाळी कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे कुलस्वामिनी मंगल कार्यालयात विठ्ठल रुक्मिणी वारकरी रूप स्पर्धा घेण्यात आली. आठ फुटी भव्य उंच विठ्ठल मूर्ती सजावट जवळपास १८ बाय ३२ फुटी स्टेजवर साकारण्यात आली होती. या उपक्रमास जवळपास ७० स्पर्धकांनी पारंपरिक व शिस्तीने पेहराव केला होता. विजेत्यांमध्ये गट १ महिना ते ५ वर्ष, ५ ते १० वर्ष गटात नारायणी टाकळकर, श्रीवस्त गोसावी, हर्षदा लोखंडे, देवश्री राजहंस, ओजस्वी गवारे, स्वरा गोजरे, राजे वैदही, नभा राजे, अनघा चव्हाण, जहान अरोरा, शांभवी शेवतेकर, दर्शना घोडकी, स्वर्णिका व नभा राजे, अद्विक
छत्रपती संभाजीनग 800726
अस्वलीकर, कस्तुरी गोसावी, आराध्या कुलकर्णी यांचा समावेश आहे. हा उपक्रम प्रतिष्ठानचे अलका कोरडे व विलास कोरडे, अविराज कोरडे यांच्यामार्फत घेण्यात आला. परीक्षक म्हणुन साई महाशब्दे यांनी काम पाहिले. एंकर भावना लुटे
या होत्या. यावेळी माधुरी अदवंत, रमा नावंदर, शीतल राजपूत, सना शेख, संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रल्हाद राठोड, कुलकर्णी मामा, अनिल गावंडे, नरवडे नथुराव, भावना सोनी यांनी मेहनत घेतली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions