पैठण तहसील कार्यालयात मतदार यादी पुनर्निरीक्षण बैठक

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : मतदार यादी ही लोकशाहीची आधारशिला असून प्रत्येक पात्र मतदारांचे नाव यादीत समाविष्ट होणे आणि अपात्र नोंदणी वगळणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. सखोल पुननिरीक्षण मोहिमेत कोणतीही हाय गय न करता अचूक व वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे निर्दे श अतिरिक्त जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांनी तहसील कार्यालय येथे आयोजित मतदार यादी पुननिरीक्षण बैठकीत अधिकारी कर्मचारी यांना दिले आहे.

मतदार यादीतील त्रुटी दूर करून प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत मतदानाचा अधिकार पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मतदार यादीच्या सखोल पुनरिक्षण अभियान पैठण, या पार्श्वभूमीवर गुरुवारी पैठण तहसील कार्यालयात दोन महत्त्वपूर्ण बैठका उत्साहपूर्ण वातावरणात  झाल्या. 

दुपारच्या सत्रात बीएलओ, पर्यवेक्षक, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, शिक्षक व विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांची आढावा बैठक झाली, तर सायंकाळी सर्व राजकीय पक्षांचे तालुकाप्रमुख व बीएलए यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेण्यात आली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे होते. त्यांनी मतदार यादी ही लोकशाहीची आधारशिला असल्याचे सांगत, प्रत्येक पात्र मतदाराचे नाव यादीत समाविष्ट होणे आणि अपात्र नोंदी वगळणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. सखोल पुनरिक्षण मोहिमेत कोणतीही हयगय न करता अचूक व वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे निर्दे श त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी मतदार यादी पुनरिक्षणाची कार्यपद्धती, क्षेत्रीय पडताळणी, नवमतदार नोंदणी, मृत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तहसीलदार ज्योती पवार यांनी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, बीएलए आणि निवडणूक यंत्रणेमधील समन्वयाचे महत्त्व विशद केले. मतदार यादीतील त्रुटी कमी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीस नायब तहसीलदार निवडणूक वैशाली कांबळे, अमोल पाखरे, रेवणनाथ खेडकर, शुभम घटे, बाळु गारुळे, इम्रान शेख, दादासाहेब गटकळ तसेच सर्व बीएलओ, पर्यवेक्षक, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद व पंचायत समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सायंकाळी झालेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीत विविध पक्षांच्या तालुकाप्रमुखांनी मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रियेबाबत सूचना व मते मांडली. प्रशासन आणि राजकीय पक्ष यांच्यातील समन्वयातून पैठण तालुक्यातील मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या दिशेने ही बैठक महत्त्वपूर्ण होती.