गंगापूर, (प्रतिनिधी) : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सघन पुनरिक्षण कार्यक्रम (एसआयआर - २०२६) अंतर्गत गंगापूर विधानसभा मतदारसंघात मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवली जात आहे.
या मोहिमेत सध्याच्या मतदार यादीतील नावे सन २००२ च्या शेवटच्या विशेषपुनरिक्षणातील नोंदीशी मॅप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेषतः १८ ते४२ वयोगटातील ज्या मतदारांची नावे २००२ च्या यादीत नाहीत, अशा मतदारांचे पालक अथवा कुटुंबीयांच्या नोंदीशी सबंध जोडून मॅपिंग केले जाणार आहे.
तसेच विवाहानंतर इतर गावात मतदार यादीतील एकूण ३ लाख ७६ हजार १२८ मतदारांची नावे मॅप करण्याचे काम २६५ बीएलओ व २६ पर्यवेक्षकांच्या माध्यमातून माहेरच्या नोंदींशी जोडणी करणार सुरू आहे. या मोहिमेत बूथ लेव्हल एजंट, ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, सरपंच तसेच इतर स्थानिक पदाधिकारी यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. बीएलओ घरपोच भेटी देणार असल्याने नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती उपलब्ध करून सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी केले आहे.
स्थलांतरित झालेल्या महिलांच्या बाबतीतही त्यांच्या माहेरच्या नोंदींशी जोडणी करण्यात येणार आहे. एसआयआर मॅपिंग प्रक्रियेदरम्यान २००२ व २०२५ च्यामतदार यादीतील नावे जुळविण्याचे काम टेबल टॉप अॅक्टिव्हिटीद्वारे सुरू आहे. ज्या मतदारांची नावे जुळतात, त्यांची नोंद बीएलओ अॅपवर करण्यात येत आहे.
तर ज्या मतदारांची नावे जुळत नाहीत, अशा अनमॅप्ड मतदारांची माहिती संकलित करण्यासाठी गावपातळीवर विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. ग्रामस्तरावर प्रचार, प्रसार, दवंडी, स्थानिक माध्ययमाद्वारे जनजागृती केली जाणार आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्याऱ्यांनी नागरिकांपर्यंत मोहिमेची माहिती दिली जाणार आहे.














