गंगापूर, (प्रतिनिधी) ; गंगापूर तालुक्यात २०२६ साली होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गंगापूर तालुक्यात येत्या ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेचे ९ गट तर पंचायत समितीचे १८ गण आहेत. तालुक्यातील एकूण मतदारसंख्या २ लाख ९८ हजार ४६ असून, त्यामध्ये १ लाख ५७हजार पुरुष, १ लाख ४७ हजार महिला व १४ इतर मतदारांचा समावेश आहे.
या निवडणुकीसाठी तालुक्यात ३४७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एकच बॅलेट युनिट राहणार असून मतदारांना दोन मते द्यावी लागणार आहेत. यामध्ये एक मत जिल्हा परिषदेसाठी तर दुसरे मत पंचायत समितीसाठी देणे आवश्यक आहे. दोन्ही मते दिल्यानंतरच मतदाराची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मतदान ७ फेब्रुवारी रोजी होणार असून मतमोजणीची प्रक्रिया ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. मतमोजणी पूर्ण होईपर्यंत कोणताही उमेदवार विजयी घोषित केला जाणार नाही, असेही यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, मतदान साहित्याचे वितरण ६ फेब्रुवारी रोजी गंगापूर येथील मुक्तानंद महाविद्यालयाच्या आवारातून करण्यात येणार असून, सर्व मतदान पथके
मतदारांनी मतदान करताना गंगापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्हींसाठी मतदान करणे आवश्यक आहे. एकच बॅलेट युनिट असल्याने मतदारांनी काळजीपूर्वक दोन्ही मते नोंदवावीत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज आहे.
- विजय राऊत, अप्पर जिल्हाधिकारी तथा
निवडणूक निर्णय अधिकारी
गंगापूर तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, मतदारांनी निर्भयपणे मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग घ्यावा.
- नवनाथ वगवाड, सहाय्यक निवडणूक
निर्णय अधिकारी तथा तहसीलदार












