सिल्लोड, (प्रतिनिधी): रहिमाबाद जि. प. सारोळा येथे विद्यार्थ्यांना १०० झाडे वाटप, करुन प्रांगणात वृक्षारोपण केले. वृक्षवल्ली टिमने यावेळी वनसंवर्धन दिन आणि लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.
वृक्षवल्ली टीमने एक विद्यार्थी एक झाड या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ७, ५०० हजार झाडे विद्यार्थ्यांना वाटप केले आहे. ११ हजार झाडे वाटप करण्यात येणार आहे. येथील जेष्ठ नागरिक तुकाराम वराडे यांनी निवृत्त झाल्यानंतर त्या दिवसापासून ते आतापर्यंत झाडे लावण्याचे काम केले आहे. त्यांनी सारोळा येथील स्मशानभूमी संपूर्ण झाडांनी हिरवीगार करून टाकली. शाळेच्या प्रांगणात सेंद्रिय भाजीपाला तयार करून विद्यार्थांना मार्गदर्शन देत प्रेरणा दिली.
या बद्दल टीमचे अध्यक्ष डॉ. शेखर दौड यांनी तुकाराम वराडे यांचा केला. निवृत्त झाल्यावर आपण काय वेगळे आणि उपयोगी करू शकतो याचे उत्तम उदाहरण वराडे यांनी जगासमोर आणि समाजासमोर मांडले. आणि त्याचे अनुकरण सर्वांनी करावे असे प्रतिपादन डॉ. शेखर दौड यांनी केले.
याच बरोबर योगेश दिवटे यांनी प्रचंड होणारी वृक्षतोड कशी थांबवता येईल. याकडे बारकाईने स्थानिक पातळीवर लक्ष घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना सांगितले. डॉ. रोकडे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी वृक्षवल्ली टीमने आर्यभट्ट अंतराळ शाळा, काँम्प्युटर रूम, आयटी लॅबला भेट दिली.
या वेळी युवा उद्योजक योगेश दिवटे, डॉ. शेखर रोकडे, डॉ. वराडे, मुख्याधापक बावसकर, शिक्षक पंडित गावाचे सरपंच, उपसरपंच, शालेय समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष, पोलीस पाटीलसह गावकरी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













