वाळूज महानगर, (प्रतिनिधी) : गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या गोवंश कत्तलखान्यावर रविवारी (दि.१२) पहाटे ४ वाजेच्या सुमारास वाळूज १४ पोलिसांनी छापा मारला. यावेळी १४ जनावरांची सुटका करण्यात आली तर, १ लाख ५ हजार रुपये किमतीचे अडीच क्विंटल मांस जप्त करण्यात आले आहे.
शेंदूरवादा गावात गोवंश कत्तलखाना मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची हत्या केली जात असल्याची माहिती पोलीस निरिक्षक शिवचरण पांढरे यांना मिळाली. त्यानुसार रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास पथकाने छापा मारला. त्यावेळी ६० किलो गोमांस तर अन्य एका रुममध्ये २ क्विंटल मांस दिसून आले. तर बाजुला बांधलेल्या १४ जणावरांची सुटका
करण्यात वाळूज पोलीस ठाण्यात मुस्तकीम शकील कुरेशी, शरीफ इसाक कुरेशी, सलीम बाबू कुरेशी, अफरोज अब्बास कुरैशी व अन्य दोन फरार अशा सहा आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई निरिक्षक शिवंचरण पाढरे यांच्या मागदर्शनाखाली पोअं नितीन धुळे, सुधाकर पाटील, गजानन सपकाळ, विजय पिंपळे, मपोअ त्रिभुवन गुन्हे शाखेचे पोह तायडे डोईफोडे यांनी केली.













