औरंगाबाद: समर्थनगर भागातील पेठे ज्वेलर्स मध्ये मॅनेजरनेच इतर तीन सहकार्यांच्या मदतीने २७ कोटी ३१ लाख रुपयांचे ५८ किलो सोने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या प्रकरणी चार जनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकुर राणे, राजेंद्र जैन, लोकेश जैन, व एक महिला (सर्व राहणार औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत.
समर्थनगर भागातील पेठे ज्वेलर्स मध्ये अंकुर राणे हा म्यानेजर पदावर कार्यरत होता. दुकानाची सर्व जबाबदारी विश्वासाने राणेंवर सोपविण्यात आली होती. दुकानातील सोने हिरे दागदागिन्यांची विक्री व व्यवहार राणेच सांभाळत होता मात्र दुकानात ठेवलेले 58 किलो वजनाचे सोन्याचे दागदागिने ज्याची किंमत २७ कोटी ३१ लाख रुपये इतकी होती ते सोने तीन सहकारी यांच्या मदतीने लंपास केली. या घटनेची कुणकुण पेठे ज्वेलेर्स चे मालक विश्वनाथ प्रकाश पेठे (रा.मुंबई) यांना लागली असता त्यांनी शहानिशा केली असता ५८ किलो सोने लंपास असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पेठे यांच्या तक्रारी वरून क्रांतिचौक पोलीस ठाण्यात चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. हा तपास आर्थिक गुन्हे शाखे कडे वर्ग करण्यात आला आहे.











