वारकरी, भाविकांना पाच क्विंटल बुंदी प्रसाद वाटप

Foto
पैठण, (प्रतिनिधी) :  संत एकनाथषष्ठी निमित्त शालिवाहन पतसंस्था परिवार व श्री सिद्धिविनायक व्यापारी सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने पाच क्विंटल बुंदीचा प्रसाद वाटप करण्यात आला. 

भारतातून आलेल्या हजारो भाविक भक्तांनी या बुंदीप्रसादाचा लाभ घेतला.  या प्रसंगी शालिवाहन पतसंस्थेचे चेअरमन किशोर चौहान, व्हाइस चेअरमन डॉ. जयंत जोशी, मानद सचिव प्रकाश कासलीवाल, संस्थेचे संचालक गणेश लोहिया, दीपक आहुजा, बाबासाहेब राऊत, ज्योती मैड, सुमनताई मस्के, डॉ. पंडित किल्लारीकर, सुनील शेळके, अॅड. राजेंद्र गोर्डे, रुपेश चौहान, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जितु परदेशी, नगरसेवक सुनील रासने, महेश मुंदडा, ज्ञानेश्वर दहिवाळ, सोनारे, संजय सोनारे, मस्के अण्णा, वसंत गोरे, उमेश तट्टू, अॅड. प्रीतम साबू, दामोधर गरड, बबनराव गाडेकर, संतकुमार धवन, सतीश राधेश्याम लखोटिया, लखोटिया, ताराचंद शिंगावी, एकनाथ पटेल, अविनाश हिंगणे, सचिन उंडाळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आले. 

मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण गायके यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सर्व शालिवाहन पतसंस्था परिवाराने विशेष परिश्रम घेतले.