नवी दिल्ली : अमेरिकेच्या न्याय विभागाने शुक्रवारी लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित हजारो कागदपत्रे प्रसिद्ध केली. ज्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेत तर भूकंपच आला. या भूकंपाच्या झळा थेट ब्रिटनपर्यंत जाऊन पोहोचल्या. हैराण करणारे म्हणजे थेट अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचाही फोटो यात आलाय, ज्यामुळे ते पुलमध्ये मुलींसोबत वेळ घालवताना दिसत आहे. सुरूवातीला असा दावा करण्यात आला की, अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही या प्रकरणात नाव आहे आणि त्यांचेही खळबळ उडवणारे फोटो आहेत. मात्र, नुकताच प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रांमध्ये आणि फोटोंंमध्ये डोनाल्ड ट्रम्प गायब असल्याचे दिसतंय. यामुळे आता असा दावा केला जात आहे की, जेफ्री एपस्टीनचे कागदपत्रे पुढे आली आहेत, मात्र त्यामध्ये काहीतरी मोठा झोल आहे.
जेफ्री एपस्टीन कागदपत्रांच्या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांनीच सही केली होती आणि त्यानंतर हे सत्य जगापुढे आले. मात्र, ज्या डोनाल्ड ट्रम्प यांचा वारंवार या प्रकरणात उल्लेख केला जात होता, ते मात्र दूर आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, एपस्टीन फाइल्स ट्रान्सपरन्सी कायद्यांतर्गत न्याय विभागाला दोषी लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित फाइल्स प्रसिद्ध करणे आवश्यक होते. एपीच्या वृत्तानुसार, या फाईल्समध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे देखील छायाचित्रे समाविष्ट आहेत.
मात्र, व्हाईट हाऊससमोर एपस्टीनसोबतच्या कथित संबंधांबाबत अद्याप कोणतेही नवीन खुलासे पुढे आली नाहीत. जर हे फोटो पुढे आले असते तर डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्राध्यक्षपद धोक्यात आले असते, असे सांगितले जाते. यामुळे जगासमोर इज्जत जाण्याऐवजी डोनाल्ड ट्रम्प यांना या प्रकरणात वाचवण्यात आल्याची चर्चा आहे. काही रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले की, एपस्टीनचे संबंध थेट पुढे आल्यानंतर व्हाईट हाऊस आणि प्रशासन काही महिन्यांपासून ते दाबत होते.
सिद्ध केलेल्या फाइल्समध्ये ट्रम्प यांचे काही फोटो समाविष्ट आहेत. ज्यात ट्रम्प आणि एपस्टीन फेब्रुवारी २००० मध्ये, त्यांच्या मैत्रीत कटुता येण्यापूर्वी, ट्रम्प यांच्या पाम बीच येथील ङ्गमार-अ-लागोफ क्लबमधील एका कार्यक्रमात सध्याच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत पोज देताना दिसत आहेत. मात्र, हे फोटो व्हायरल झाल्यानंतर असे सांगितले जात आहे की, ट्रम्प यांचे खरे फोटो जगापुढे आलेच नाहीत.