एका तरुणाने खवड्या डोंगरावरून उडी घेत आत्महत्या केली.ही थरारक घटना रस्त्याने जाणाऱ्या नागरिकाने मोबाईल मध्ये कैद केली
रावसाहेब भाऊसाहेब माळी ( रा.तीसगाव) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, आज संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास दोन तरुण हे तिसगाव जवळील खवड्या डोंगराच्या कड्यावर काही अंतरावर उभे होते.समोर किनाऱ्यावर आत्महत्या करण्यासाठी रावसाहेब उभा होता व त्याला एक तरुण रोखत होता.काही क्षणातच त्या तरुणाने डोंगरावरून अनेक फुटवरून उडी घेत आत्महत्या केली. हा सर्व थरारक प्रकार रस्त्याने जाणाऱ्या एका नागरिकाने आपल्या कॅमेरात कैद केला आहे.तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण अदयाप समोर आले नाही .या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर सावंत करीत आहे.