खुलताबाद, (प्रतिनिधी) : तालुक्यातील येसगाव येथील गिरीजा मध्यम प्रकल्पातील पाणी साठा झपाट्याने कमी झाल्याचे चित्र आहे. यंदा पावसाळ्यात एक पूर पाणी वगळता धरणात पावसाळ्यात पुरपाणीच आले नसल्याने जुनाच पाणी साठा आहे.
पावसाळ्यात २० २५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. तर बाष्पीभवन वारा उन्ह बघता पाणी साठा कमी कमी होत होत १३ टक्क्यांवर आता १२ --पाणी साठा शिल्लक राहिला आहे.
खुलताबाद व फुलंब्री तालुक्यातील काही गावे तथा खुलताबाद शहर व ग्रामीण भागासाठी गिरीजा प्रकल्प मध्यम धरणातील पाण्याचा पुरवठा होतो. यंदा पावसाळ्यात पाऊस नाही मग पुरपाणी मागचाच पाणी -नाही. साठा ८ ९ महिन्यापर्यंत तालुक्याला पुरावा म्हणून प्रशासन कडून प्रयत्न आहे. पाणीसाठा शिल्लक उपलब्ध राहवे, म्हणून प्रशासन कडून देखरेख पाहणी पथक प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
तरीही प्रकल्पातील पाणी झपाट्याने साठा दररोज कमी होत असल्याचे चित्र असुण त्यामुळे चिंता निर्माण होत आहे. दोन तालुके व शहर व ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची भिस्त गिरीजा मध्यम प्रकल्पावरच आहे.












