पाणीपुरवठा आता चार दिवसाआड

Foto
नवीन पाणी योजनेला वेग; सातारा-देवळाईतही दोन दिवसात पाणी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरात नियमितपणे चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने महापालिका पाणीपुरवठा विभागाने जलकुंभनिहाय नियोजन सुरू केले आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सध्या १० जलकुंभभरण्याचे काम वेगाने सुरू असून, चाचणीच्या टप्प्यात काही भागांत तिसऱ्याच दिवशी पाणी मिळत आहे. सातारा-देवळाई परिसरातील जलकुंभांमध्येही पुढील एक-दोन दिवसांत पाणी पोहोचणार असल्याची
माहिती मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी बुधवारी दिली.
शहरासाठी २७४० कोटी रुपये खर्चाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत नक्षत्रवाडी ते हर्मूलदरम्यान टाकलेल्या १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून एन-५ आणि टीव्ही सेंटर येथील जलकुंभ भरले जात आहेत. एन-७, हिमायतबाग आणि हर्सल कारागृह येथील जलकुंभांमध्येही पाणी सोडण्यात येणार आहे. २००० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून पुंडलिकनगर आणि
शिवाजी ग्राऊंड येथील जलकुंभांना पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
१११८ मिमी व्यासाच्या जलवाहिनीद्वारे सातारा-देवळाईतील सुधारकरनगर, आमेरनगर आणि एजीपी स्कूल येथील जलकुंभांमध्ये लवकरच पाणी पोहोचणार आहे. ज्योतीनगर, विश्वभारती कॉलनी, हरीओमनगर, केटली गार्डन आणि पारिजातनगर परिसरातील कामेही सुरू आहेत.
पंपिंगचा खर्च घटणार
खच नवीन योजनेमुळे पंपिंगची गरज कमी झाल्याने महापालिकेचा घटणार असून नागरिकांना अधिक दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, चाचणीत काही भागांना तिसऱ्या दिवशी पाणी मिळत असले तरी नियमित चौथ्या दिवशी पाणी देण्याचेच नियोजन असल्याचे आयुक्त येडगे यांनी स्पष्ट केले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions.