छावणीत पाईपलाईन फुटल्याने जुन्या शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शहरातील जलवाहिन्यांवरील गळती रोखण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या शटडाउनमुळे आधीच पाण्याचा ठणठणाट असताना, मंगळवारी (दि. १२) पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडाचा फटका नागरिकांना बसला. रेल्वेस्टेशन रोडवरील महापौर बंगला परिसरात असलेल्या छावणी परिषदेच्या पाईपलाईनला मोठी गळती लागल्याने ती दुरुस्त करण्यासाठी जुन्या शहराचा पाणीपुरवठा सलग पाच तास रोखून धरण्यात आला. आधीच कोरड्या पडलेल्या नळांमुळे हैराण झालेल्या नागरिकांचा या निर्णयामुळे संयम सुटला असून, महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात नव्या योजनेचे पाणी शहराला मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण नागरिकांचा अपेक्षाभंग झाला. त्यात जुन्या पाणी योजनांमध्ये बिघाड सुरूच असल्याने शहरात आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. एकीकडे उन्हाचा चटका वाढत असताना दुसरीकडे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. जायकवाडी परिसरातील स्मशानभूमीजवळ १,२०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर गळती
बालाजीनगरात ११ दिवसांपासून ठणठणाट
गेल्या अकरा दिवसांपासून बालाजीनगर व परिसरात पाणीबाणी झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. मनपाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. गेल्या शनिवारी पाणीपुरवठा झाला होता. त्यानंतर बुधवार (दि.१३) द्वारपर्यंत पाणी सोडले नाही. पाणीपुरवठा विभागाचे सुमित बोराडे यांनी सांगितले की, छावणीजवळ जलवाहिनी फुटली असून बुधवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले, मात्र दुपारपर्यंत पाणी आले नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले.
लागल्याने, दुरुस्तीच्या कामासाठी ८ मे रोजी रात्री शटडाउन घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र त्याचदरम्यान फारोळा येथील पंपगृहाजवळ १,२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली व पाणी पंपगृहात शिरले. त्यामुळे ७ मे रोजी रात्रीच दोन्ही ठिकाणच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी २१ तास लागले. ९ मे रोजी सकाळपासून
शहराचे पाणी वितरण सुरू झाले. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत दुरुस्तीसाठी पाणी बंद करावे लागले. रेल्वेस्टेशन रोडवरील अयोध्यानगरी मैदानासमोरील मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. सायंकाळी ५ पर्यंत काम चालले. या काळात एक्स्प्रेस जलवाहिनीद्वारे सिडको-हडकोचा पाणीपुरवठा मात्र सुरळीत होता, असे सूत्रांनी सांगितले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions