सिल्लोड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील जुना पाणी व सारोळा रस्ता लागुन असलेल्या वस्ती भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती.
ही बाब विविध सहकारी संस्था अध्यक्ष अशोक पाटील साखळे, सरपंच अनिता नामदेवराव साखळे, भाजपचे भवन मंडळ अध्यक्ष हरिदास पाटील साखळे यांनी पंचायत समिती सभापती अनिता सुरेश बनकर व पंचायत समिती सदस्य गजानन जाधव यांच्या लक्षात आणून दिली, त्यांनी लगेच ग्रामसेवक दिनेश राठोड यांना टँकरचा प्रस्ताव सादर करण्यात आदेश देऊन टँकर मंजूर करून दिले.
शुक्रवारी टैंकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. याचे उद्घाटन हरीदास पाटील साखळे, मुख्याध्यापक नामदेवराव साखळे, सामाजिक कार्यकर्ते विष्णू फरकाडे, गणपत पाटील सरोदे, सांडु सपकाळ, कृष्णा फरकाडे, अमोल साखळे यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे लिहाखेडी बसस्थानक पासून सारोळा रस्ता लागुन असलेल्या वस्ती सह जुना पाणी वाडीला पाणी मिळणार आहे.