छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) : सामान्य नागरिकांना जलसंधारणाचे महत्व कळावे म्हणून जलसंधारण सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर जल व भूर्मा व्यवस्थापन संस्था (वाल्मी) तर्फे मंगळवारी (दि.१८) ऑगस्ट रोजी खुलताबाद तालूक्यातील टाकळी राजेराय (ता. खुलताबाद) येथे मृद व जलसंधारण जनजागृती कार्यक्रम पार पडला.
मृदसंधारण व जलसंधारण हे शेती, पर्यावरण व शाश्वत विकासाचा पाया आहे. माती आणि पाणी हे नैसर्गिक संसाधने एकमेकांवर अवलंबून असून भविष्यातील पिढीसाठी त्यांचे रक्षण करणे गरजेचे आहे, या उद्देशाने जनजागृती करण्यासाठी १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह होत आहे.
सप्ताहाअंतर्गत वाल्मीतर्फे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांची प्रभात फेरी काढण्यात
आली. या फेरीत पाणी आडवा पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. प्रभात फेरीमध्ये २५५ विद्याथ्यर्थ्यांनी सहभाग घेतला. फेरीनंतर डॉ. मोहन नारखेडे यांनी जलसंधारण सप्ताहासंदर्भात माहिती दिली.
डॉ. पराग भागवत यांनी दिवंगत सुधाकरराव नाईक यांचे जलसंधारणातील योगदान, डॉ. हरीश देशपांडे यांनी कृषी विषयावर तर डॉ. कनिष्क यांनी उपस्थितांना मृद व जलसंधारणाची शपथ दिली. यावेळी शाळेत मृद व जलसंधारण विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. प्राचार्य वसंतराव राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच मुस्ताक पटेल, उपसरपंच गुलाब कुचे, शालेय समिती अध्यक्ष हरुण पटेल, शिक्षक विपुल तिकळे, संजय होळकर यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती.














