जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुद्देशवाडगाव येथे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील मुद्देश वाडगाव येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुद्देश वाडगाव येथे प्रवेशोत्सव निमित्त इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण व आगळ्या-वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.

शाळेत नव्याने दाखल झालेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची गावातून सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये बसवून ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजतजिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुद्देशवाडगाव येथे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत मिरवणूक काढण्यात आली. 

या मिरवणुकीमुळे व विद्यार्थ्यांच्या घोषणांनी गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या उपक्रमामध्ये ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण निर्माण करणे, प्रवेश वाढविणे व शिक्षणाबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. 

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत नियमित शाळेत उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याचे आवाहन केले. चला शाळेत जाऊया, आनंदाने शिक्षण घेऊया या संदेशासह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.