वॉशिग्टन : अमेरिकन हल्ल्यांमुळे इराणच्या खार्ग बेटाचे मोठे नुकसान झाले आहे आणि त्यानंतर आणखी हल्ले होऊ शकतात असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आपण फक्त मनोरंजनासाठी आणखी काही वेळा हल्ला करू शकतोफफ, असं ट्रम्प म्हणाले. तेहरान संघर्ष संपवण्यासाठी चर्चा करण्यास तयार दिसत असले तरी, ङ्गङ्घअटी अद्याप पुरेशा चांगल्या नाहीतफफ असे ते म्हणाले.
अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील संघर्षाला तीन आठवडे होत असताना दोन्ही बाजूंनी दीर्घ संघर्षाची तयारी करण्याचे संकेत दिले जात आहेत. त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी मनोरंजनासाठी अधिक हल्ले करणार असल्याचं विधान केलंय.
नौदल पाठवण्याचे आवाहन
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलावर अवलंबून असलेल्या देशांना शिपिंग मार्ग सुरक्षित करण्यासाठी नौदल पाठवण्याचे आवाहनही ट्रम्प यांनी केले. जगातील ज्या देशांना होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल मिळते त्यांनी त्या मार्गाची काळजी घेतली पाहिजे आणि आम्ही खूप मदत करूफफ, असं ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिले. हा मार्ग शिपिंगसाठी खुला राहील याची खात्री करण्यासाठी अमेरिका इतर देशांशी समन्वय साधेल, असे त्यांनी सांगितले.
ही सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा मार्गांपैकी एक आहे, जिथे जागतिक तेल आणि वायू पुरवठ्याचा मोठा वाटा पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातामधील अरुंद जलमार्गातून जातो. शिपिंगमधील वाढत्या जोखमींमुळे ऊर्जेच्या किमती वाढल्या आहेत आणि पुरवठ्यातील व्यत्ययांबद्दल चिंता निर्माण झाली आहे.
ट्रम्प काय म्हणाले?
दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ङ्गङ्घमोजतबा खामनेई जिवंत आहेत की नाही, हे कोणालाच माहीत नाही. कोणीही त्यांना पाहिलेले नाही. मी तर असे ऐकले आहे की ते कदाचित आता या जगात नाहीत. जर ते जिवंत असतील, तर त्यांनी शहाणपणा दाखवून आत्मसमर्पण करावे.ङ्घङ्घ ट्रम्प यांच्या या विधानामुळे मोजतबा यांच्या मृत्यूच्या अफवांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.