अंधारी येथे विहिरीचे उद्घाटन; ग्रामस्थांना मिळणार दिलासा

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : अंधारी येथे समाज कल्याण विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या विहिरीचे उद्घाटन पार पडले. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या पुढाकारातून विहीर मंजूर करण्यात आली. या विहिरीचे उद्घाटन माजी सभापती ज्ञानेश्वर पाटील तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत, त्यांच्या पुण्याईमुळेच आज समाजातील सर्व घटकांपर्यंत विविध शासकीय सुविधा पोहोचत असल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. 

उद्घाटन प्रसंगी माजि उपसरपंच राजू वानखेडे, काकासाहेब, भगवान थोरात, बंगाली बाबा थोरात, ज्ञानेश्वर वानखेडे, रवींद्र वानखेडे, राहुल वानखेडे, गणेश पवार, समाधान तायडे, मधुकर तायडे, कमाल पटेल तसेच गावकरी व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात नव्याने उभारण्यात आलेल्या या विहिरीमुळे पाण्याची समस्या कमी होण्यास मदत होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.