Maharashtra Weather Update : मराठवाडा आणि महाराष्ट्रासाठी काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

Foto
पुणे : महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून राज्यभरात पुढील 2  दिवस मुसळधार पावसाचे अलर्ट हवामान विभागाने दिले आहेत.  मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आजपासून 17 ऑक्टोबरपर्यंत  वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच कोकण व गोवा भागामध्येही पावसाला पोषक वातावरण आहे. IMDने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसात राज्यभरातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी फिरेल. 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशभरातून नैऋत्य मोसमी पाऊस परतण्यासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे .येत्या दोन दिवसात देशभरातून मान्सून माघारी फिरेल .त्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी पावसाची शक्यता असेल . प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून मिळालेल्या माहितीनुसार, कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमानात कोणताही बदल होणार नाही .त्यानंतर हळूहळू किमान तापमान दोन ते तीन अंशांनी वाढेल अशी शक्यता IMDने वर्तवली आहे .

Maharashtra Rain: कुठे यलो अलर्ट?

राज्यभरात आज बहुतांश  भागात पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. तळकोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आले आहेत. रायगड, ठाणे भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नगर, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे यलो अलर्ट देण्यात आले आहेत. तर उद्या (16 ऑक्टोबर) बहुतांश राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर पावसाचा जोर ओसरणार आहे. 

16 ऑक्टोबर -रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, नाशिक, नगर, धुळे, जळगाव, संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे . तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . मुंबई ,ठाणे ,पालघर भागात पावसाची शक्यता आहे .

17 ऑक्टोबर - पालघर, नाशिक, जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .मराठवाडा मध्य महाराष्ट्र व तळ कोकणात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .

मान्सूनच्या परतीच्या पावसाची सध्य:स्थिती काय? 


मान्सूनने आज त्याच्या परतीच्या प्रवासात यू. पी., एम पी, बिहार, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गोवा ओलांडून कर्नाटक तेलंगणा प. बंगाल व पूर्वोत्तर राज्यात प्रवेश केला आहे. त्याची आजची सीमा रेषा कारवार कलबुर्गी निझामाबाद कांकर केओंझघर सागर आयलंड गुवाहटी  शहरातून जात असुन देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी 85 टक्के भागातून मान्सून परतलेला आहे.