शासकीय जागेवर अनधिकृत इमारत बांधकाम प्रकरणी काय कारवाई केली ?

Foto
याचिकाकर्त्यांनी दोन आठवड्यात शपथ पत्र दाखल करावे : खंडपीठ

पैठण, (प्रतिनिधी): पैठण शहरातील नाथषष्ठी यात्रेसाठी राखीव असलेल्या जागेवर अनधिकृत बांधण्यात आलेल्या अनधिकृत व्यापारी संकुलन बांधकाम संदर्भात रमेश लिंबोरे व सतीश आहेर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका क्रमांक १४ /२०१६ दाखल केली होती.

परंतु जनहित याचिकेतील निर्देशाप्रमाणे कारवाई न याचिकाकर्त्यांनी झाल्याने अवमान याचिका क्रमांक २९४ / २०१७ दाखल करूनही अनाधिकृत इमारतचे बांधकाम करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली नाही. तसेच अद्याप दुसऱ्या अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यात आली नाही. 

याबाबत २१ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले. या वेळी उच्च न्यायालयाने सरकारी वकील यांना विचारणा केली असता सरकारी वकील यांनी सांगितले की, एक इमारत पाडली आहे. दुसरी सील केली आहे. अधिकाऱ्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा अहवालपुढच्या सुनावणीला न्यायालयात दाखल करण्यात येईल असे सांगीतले. 

तसेच या सील करण्यात आलेल्या इमारत प्रकरणी याचिकाकर्त्यांनी दोन आठवड्यात नवीन शपथ दाखल करावे, असे निर्दे श उच्च न्यायालयाने दिले. याचिका कर्त्याच्या वतीने अॅड. किरण जाधव यांनी बाजू मांडली.