घाटीत व्हील बेस्ड सर्जिकल स्किल लॅब ट्रेनिंग प्रशिक्षण

Foto
जॉन्सन अँड जॉन्सनच्या इन्स्टिट्यूट ऑन व्हील्स उपक्रमांतर्गत सहकार्य
घाटीत व्हील बेस्ड सर्जिकल स्किल लॅब ट्रेनिंग प्रशिक्षण
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महाविद्यालय शासकीय वैद्यकीय व रुग्णालय येथे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. सरोजिनी जाधव यांनी व्हील बेस्ड सर्जिकल स्किल लॅब ट्रेनिंग हे तीन दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या - इन्स्टिट्यूट ऑन व्हील्स या उपक्रमांतर्गत या प्रशिक्षणासाठी आवश्यक साहित्य व सुविधा उपलब्ध करून सहकार्य करण्यात आले.
तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये वैद्यकीय पदवीपूर्व विद्यार्थी तसेच पदव्युत्तर निवासी डॉक्टरांना
प्रत्यक्ष कृतीतून शल्यचिकित्सा कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ३० ऑक्टोबर रोजी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते फीत कापून प्रशिक्षण
कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वैद्यकीय शिक्षणामध्ये प्रत्यक्ष कौशल्य प्रशिक्षणाचे महत्त्व तसेच भविष्यातील वैद्यकीय कारकिर्दीत या कौशल्यांची
शस्त्रक्रिया कौशल्यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना गाऊनिंग, सर्जिकल स्यूचरिंग (टाके घालणे), नॉटिंग (गाठी बांधणे) यांसारख्या मूलभूत शल्यचिकित्सा कौशल्यांबरोबरच आतड्यांची जोडणी (बॉवेल अॅनास्टोमोसिस), रक्तवाहिन्यांची दुरुस्ती (व्हॅस्क्युलर रिपेअर), टेंडन रिपेअर, पोटाच्या जखमेचे क्लोजर (अॅब्डॉमिनल क्लोजर) तसेच लॅपरोस्कोपिक स्यूचरिंग यांसारख्या प्रगत शस्त्रक्रिया कौशल्यांचे प्रात्यक्षिक व प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
असलेली आवश्यकता अधोरेखित केली.
याप्रसंगी उपअधिष्ठाता डॉ. विनोद मुंदडा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, शल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. सरोजिनी जाधव, पथकप्रमुख डॉ. अनिता कंडी विभागातील
इतर प्राध्यापक व वैद्यकीय शिक्षक उपस्थित होते. हे प्रशिक्षण डॉ. सरोजिनी जाधव, डॉ. सुरेश हरबाडे, डॉ. अनिता कंडी, डॉ. नोमान खान, डॉ. विशाखा अय्यर, डॉ. जगन्नाथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली देखरेखीखाली उत्साहात पार पडले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions