औरंगाबाद- जिल्ह्यातील भाजपाची शक्ती पाहून खैरेंच्या पोटात सध्या दुखत आहे त्यामुळे ते कोणतेही बेछूट आरोप करत असून खासदार चंद्रकांत खैरेंनी अगोदर किती बाजार समितीच्या किती जागा हडप केल्या, किती जमिनी मी विकल्या आणि मी किती पैसे घेतले याबाबत अगोदर पुरावे द्यावेत, नुसतेच त्यांनी आपल्या भाषणबाजीतून पोकळ आणि बेछूट असे आरोप करू नये खासदार खैरे हे गेल्या वीस वर्षांपासून खासदार आहेत त्यांना तसेही तरी कोणी गांभीर्याने घेत नाही जरी ते असे भाषणबाजी करत असतील तरी त्यांनी नारेगाव कचऱ्या बाबत आपल्या महापौरांना अधिक माहिती विचारावी अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंनी खा. चंद्रकांत खैरेंना सांजवार्ता ऑनलाइनशी बोलताना प्रतिउत्तर दिले. आता यावर खा. खैरे काय सारवा सारव करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
खासदार चंद्रकांत
खैरे हे राजाबाजार वार्डात व्यापाऱ्यांच्या वतीने मनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक यांच्या आयोजित सत्कार
समारंभात बोलत होते. चंद्रकांत खैरे यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे
यांच्यावर शिवसेना स्टाईल मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत भ्रष्टाचार केल्याचा
आरोप केला. खैरे हे गेल्या
वीस वर्षांपासून खासदार आहेत त्यांना तसेही तरी कोणी गांभीर्याने घेत नाही आणि आता
तर लोकही त्यांच्या भाषणाला गांभीर्याने घेत नाही. तुम्हीही घेऊ नका असा पलटवार
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केला. जरी ते असे भाषणबाजी करत असतील तरी
त्यांनी नारेगाव कचऱ्या बाबत आपल्या महापौरांना अधिक माहिती विचारावी.असे
सांजवार्ता ऑनलाईनशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.