हर्षवर्धन जाधवांना कोणीच तोडीस तोड नाही ?

Foto


औरंगाबाद- आधी मनसे नंतर शिवसेना मग एकला चलो रे करत स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन करणारे हर्षवर्धन जाधव यांचा कन्नड मतदारसंघ म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील महत्वाचा आणि नेहमी चर्चेत असणारा मतदारसंघ आहे. मागच्या काही काळात हर्षवर्धन जाधव यांची आक्रमक कार्यशैली आणि त्यांचा राजीनामा या गोष्टींमुळे हर्षवर्धन जाधव सर्वात जास्त चर्चेतील आमदार असल्याचे देखील बोलले जाते. मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आमदारकीचा राजीनामा देणे असो वा राजीनामा स्वीकारावा म्हणून वृत्तपत्रातून जाहिरात प्रसिध्द करणे या सर्व घडामोडींचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दिसून आला आहे.

 

हर्षवर्धन जाधव यांचे वडिल रायभान जाधव आणि मातोश्री तेजस्विनी जाधव या दोघांनीही या मतदारसंघातून आमदारकी भूषवली आहे. मात्र हर्षवर्धन जाधव मनसेतून शिवसेनेत आणि आता स्वतःचा राजकीय पक्ष त्यांनी उभा केला आहे. त्यामुळे इथले राजकीय रंग बदलतात की पुन्हा एकदा कन्नडचे लोक आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

 

औरंगाबाद मतदारसंघातील कन्नड मतदारसंघ, हा आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे राज्यात चर्चेत आलेला मतदारसंघ. कन्नड मतदार संघ काळभुई, घाटमाथा आणि खानदेशपट्टा या तीन भूप्रदेश भागात मोडला जातो. तब्बल २४० गाव या मतदारसंघात आहेत. रायभान जाधव यांची तीन टर्म, त्यानंतर तेजस्वीनी जाधव यांची टर्म, यांच्यामुळे जाधवांचा हा तसा परंपरागत मतदारसंघ. अपवादाने १९९९ मध्ये काँग्रेसच्या नितीन पाटील आणि २००४ मध्ये शिवसेनेच्या नामदेव पवार यांनी आमदारकी भूषवली. पण सत्तेचा आणि जाधवांचा हा दुरावा १० वर्षांनी संपवला तो मनसेच्या तिकीटावर उभ्या राहिलेल्या हर्षवर्धन जाधवांनी. जाधव वर्ष मनसे तर सध्या शिवसेनेकडून आमदार म्हणून निवडून आलेले जरी असले तरी त्यांनी आता स्वतःचा शिवस्वराज बहुजन पक्ष स्थापन करून स्वतःची वेगळी चूल मांडली आहे. यामुळे आता बदलेल्या राजकिय समीकरणांमुळे हा मतदारसंघ पुन्हा चर्चेत आलाय. यावेळेस हर्षवर्धन जाधव स्वतःच्या पक्षातून निवडणूक लढवणार आहेत.

 

मात्र यावेळेस ही निवडणूक त्यांना म्हणावी तशी सोपी जाणार नाही असेच चित्र दिसत आहे. यावेळी मतदारसंघातील लढत चौरंगी होण्याची शक्यता आहे.  लाख ७५  हजार मतदार असलेल्या या मतदारसंघात २००९ आणि २०१४ ची आकडेवारी पाहता, हर्षवर्धन जाधव यांना २००९  मध्ये ४६१०६  तर २०१४  (६२५४२ ) मतं पडली होती तर राष्ट्रवादी उदयसिंग राजपूत  यांना २००९  साली ४१९९९ मतं पडली होती तर २०१४ साली ६०९८१ इतकी मत पडली होती. त्यांना केवळ १५६१ मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. काँग्रेसचे भरतसिंग राजपूत हे २००९  साली २४५६९ मतांसह तिस-या स्थानी राहिले होते. तर २०१४ साली शिवसेनेतून काँग्रेस मध्ये गेलेले नामदेव पवार यांना मतदारांनी थेट चौथ्या स्थानी फेकले तर भाजपकडून डॉ. संजय गव्हाणे  २८,०३७ मतांनी तिसऱ्या स्थानी राहिले. यावेळेस हर्षवर्धन यांची ताक काही प्रमाणात कमी झालेली आहे असे मतदारांकडून बोलले जात आहे. त्यातच विकासकामे मोठ्या प्रमाणात केल्याने विजयचा विश्वास असल्याचे हर्षवर्धन जाधव सांगतात. मराठा समाजासाठी त्यांनी दिलेला राजीनामा देखील त्यांच्यासाठी फायद्याचा ठरेल असे राजकीय जाणकारांनी म्हटले आहे. 

 

काय आहे मतदारांच्या मनात?

 

मतदारांच्या बाबतीतही 'कही खुशी कही गम' असेच चित्र आहे. जाधव घराण्याला पारंपरिक मतांचा फार मोठा आधार आहे. पण काही नागरिक मात्र जाधव विकासकामांत अपयशी ठरल्याचा आरोप करताय. आमदारांनी काम केले आणि काम नाही केले असे दोन्ही बाजूने बोलणारे लोक या मतदार संघात आहेत. एकूणच मतदारसंघाचा विचार करता काही महत्वाच्या समस्या या निवडणुकीत महत्त्वाच्या ठरणार आहे.


मतदारसंघातील समस्या

 

गौताळा सारखे अभयारण्य, दोन किल्ले असूनही मोठं पर्यटन केंद्र होऊ शकले नाही. शहरांअतर्गत आणि ग्रामिण भागात रस्त्यांचे जाळे फारच तोकडे आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे, शिवना टाकळी प्रकल्प जवळ असूनही ते पाणी कन्नडपर्यंत पोहोचू शकले नाही. आमदार जनसंपर्कात फारच कमी पडतोय आमदार दिसतच नसल्याचा गावक-यांचा आरोप आहे. जाधव यांची उमेदवारी ही निश्चितच असली तरी काँग्रेस, भाजप, आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार निश्चित जरी नसले तरी इच्छुकांनी पक्षश्रेष्टींकडे चकरा मारायला सुरुवात केलेली आहे. तर शिवसेनने आपला नवीन उमेदवार शोधण्यासाठी कंबर कसली आहे. तर हर्षवर्धन जाधव यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे ही संकेत दिले आहेत. 

 

2014 मध्ये उमेदवारांना मिळालेली मते

हर्षवर्धन जाधव (शिवसेना) ६२,५४२

उदयसिंग राजपूत (राष्ट्रवादी) ६०,९८१

डॉ. संजय गव्हाणे (भाजप) २८,०३७

नामदेवराव पवार (काँग्रेस) २१,८६५

मारुती राठोड (रासप) ,७३२

सुभाष पाटील (मनसे) ,६०२

 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker