कोण मारणार बाजी? कोण मारणार बाजी ? लोकांमध्ये लागल्या पैंजा; सट्टेबाजार जोरात !

Foto

औरंगाबाद:  लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. कोण खासदार होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लोकांमध्ये तर आता पैजाच पैंजा लागल्या आहेत. सट्टेबाजारातही जोरात सट्टेबाजी लावण्यात आली आहे. चौरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार? यावरच सर्वत्र चर्चा सुरु आहे. शहरात तर काही मित्रां-मित्रांमध्ये चित्रपट दाखविण्याची पैंज लागली आहे इतकेच नव्हे तर कुणी हॉटेल्समध्ये पार्टी देण्याची पैंज लावली आहे. कुणी म्हणते खा. चंद्रकांत खैरे बाजी मारणार तर कुणी आ. सुभाष झांबड यांचे नाव पुढे करताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर कुणी म्हणते हर्षवर्धन जाधव बाजी मारणार तर कुणी म्हणते आ इम्तियाज जलीलच निवडून येणार सर्वत्र पैजांचा पाऊस सुरु आहे. 

कोण पैज जिंकणार?
सर्वत्र पैंसा जोरात लागलेल्या आहे. आता 23 मे कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकाल लागताच कोण पैज जिंकणार आणि कोण पैज हरणार हे स्पष्ट होईल. काही घरांमध्येही महिलावर्गाकडूनही पैंज लावली गेली आहे. खासदार कोण होणार? यासाठी महिलांनी आपल्या पतीकडे नवीन साडी खरेदीचीही पैंज लावली आहे. आता नवीन साडी मिळणार का? हे निकालावरच अवलंबून आहे. तर काही सट्टे बाजारांनी रोख रक्कम लावली असल्याचे बोलले जात आहे.