शिवसेना कुणाची ? सर्वोच्च न्यायायात ठाकरे गटाचा युक्तिवाद सुरु ....

Foto
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख असतानाच त्यांनी एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड केली. पक्षाच्या घटनेनुसार त्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली होती, असाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. 

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे आमदार सूरत आणि गुवाहाटीला गेले त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळ गटाची बैठक घेऊन उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांची गटनेता म्हणून निवड केली होती, अशी माहिती कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला दिली.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना कुणाची, चिन्ह कुणाचं याचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. त्या आधी निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाने त्याला न्यायालयात आव्हान दिलं. त्यावरील सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे.