छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): आरसीसी क्लासेसचे संचालक मोटेगावकर यांच्यावर नीट पेपरफुटी प्रकरणावर गुन्हा दाखल झालेला असतानाही क्लासेस सुरू कसे? असा जाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला विचारला. क्लासेस बंद करून विद्यार्थ्यांची फी परत करा आणि यापुढे आरसीसी क्लासेस चालू देणार नाही, असा इशाराही मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
आरसीसी क्लासेस कायमस्वरूपी
बंद करण्याबाबत व संचालक शिवराज मोटेगावकर व इतर सहभागी यांच्या विरुद्ध विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही यावेळी केली. मोटेगावकर व इतर संबंधितांविरुद्ध सखोल चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, क्लासेसमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून भरलेली संपूर्ण फी तात्काळ परत मिळावी यासाठी प्रशासनामार्फत योग्य ती कार्यवाही
करण्यात यावी, विद्यार्थी व पालकांवर कोणत्याही प्रकारचा दबाव, धमकी अथवा मानसिक त्रास दिला जात नाही ना, याची चौकशी करण्यात यावी, नीट पेपरफुटी प्रकरणानंतर घडलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांची विशेष चौकशी करून त्यामागील कारणांचा शोध घेण्यात यावा. तसेच विद्यार्थ्यांची फी परत द्यावी, अशा मागण्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष संकेत शेटे, वाहतूक सेना उपाध्यक्ष मनिष जोगदंडे,
मोनू तूसे, हेमंत जाधव, अक्षय देवतवाल, शुभम गंगारे, विजय लाळे, झाकीर पठाण,
RCC
560 556
अस्लम सय्यद, सुरेश राजुळेंसह आदींनी केली आहे.
Postepaper.com/wartsolutions By: Vrudhee












