छत्रपती संभाजीनगर : नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपने प्रचंड दबावतंत्राचा वापर केला असून प्रशासनाचा सुद्धा गैरवापर केला आहे. सत्तेचा माज आणि मस्ती भाजपला चढली आहे, भाजपच्याच नेत्यांचे नातेवाईक का बिनविरोध निवडून येतात? भाजपचे सामान्य कार्यकर्ते का बिनविरोध निवडून आले नाहीत? अशी विचारणा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आज केली. अंबादास दानवे यांनी भाजपचे सर्वाधिक उमेदवार बिनविरोध होत असल्यामुळे हल्लाबोल केला. त्यांनी शिंदे गटावर सुद्धा प्रहार केला.
अंबादास दानवे म्हणाले की आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे यांचे त्यांचे मंत्री ऐकत नाहीत. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑपरेटिंग करत आहेत. उदय सामंत त्यांना लीड करत असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला. जे सामनामधून सांगण्यात आलं आहे तसेच होऊ शकतं, असा दावा सुद्धा दानवे यांनी केला. ही लोकं आज ना उद्या भाजपमध्ये जाणार आहेत, गद्दारांना आमच्याकडे थारा नसल्याचे दानवे म्हणाल. दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा सुद्धा अंबादास दानवे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की सौदेबाजी का धमकी देत आहेत. अजित पवारांच्या घरचा निधी नसून तो त्यांच्या घरातून येत नाही, अजित पवार मतांसाठी धमकी देत असेल तर निवडणूक आयोग काय करत आहे? अशी विचारणा दानवे यांनी केली. निवडणूक आयोग पवारांच्या घरी पाणी भरण्यासाठी जाणार आहे का? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली.
मतदार यादीमध्ये मोठा घोळ
मतदारयादीवरूनही दानवे यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की मतदार यादी जाहीर झाल्या मतदार यादीमध्ये मोठा घोळ आहे. हजारो ठिकाणी वॉर्ड रचना गोंधळामध्ये आहे. वॉर्ड रचना केल्यानंतरही बाहेरील मतदार येतात कसे असे ते म्हणाले. मुंबई, पुण्यासह सर्वच ठिकाणी असंच घडलं असल्याचं ते म्हणाले. निवडणूक आयोग म्हणत आहे व्यक्तीने तक्रार करावी. मतदार यादीमध्ये प्रचंड घोळ असल्याने आम्ही तक्रार करणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. मतदारयाद्या चुकल्या आहेत, महानगरपालिका यादीत अधिक चुका आहेत. वॉर्ड बाहेरील लोकांची नाव आहेत. सीमारेषा बाहेरील नावं आहेत. निवडणूक आयोग झोपले आहे का? नावापुढे एक स्टार नाही, दोन स्टार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.