संपूर्ण महाराष्ट्रात गुंडागर्दी, पैशाचा महापूर ः हर्षवर्धन सपकाळ

Foto
मुंबई ः राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून निकालाचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. आज दुपारपर्यंत निकालाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. अशात विविध पक्षांच्या नेत्यांची प्रतिक्रिया येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळदेखील या निकालांबाबत माध्यमांशी बोलले आहेत. विरोधकांच्या नाकावर टिच्चून काँग्रेस विजयी होईल, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत. तसेच त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, ङ्गङ्घमहाराष्ट्रात दुबार मतदान झाले. बाहेर गावातील मतदार आणून त्यांना मंगलकार्यालयामध्ये डांबून ठेवणे, जे मतदार आहेत त्यांच्या बोटाला आधीच शाई लावून ठेवणे, असे अनेक प्रकार महाराष्ट्रामध्ये घडले. याची संपूर्ण गोळाबेरीज या निकालांच्या अनुषंगाने दिसून येणार आहे.फफ ते पुढे म्हणाले, मफ बुलढाण्यामध्ये एक विकृत स्वरूपाची शक्ती कार्यरत आहे. गुंडागर्दी, तारतम्य नसणे या पार्श्वभूमीवर बुलढाण्याची निवडणूक झाली होती. मात्र, प्रचंड प्रमाणामध्ये पैसा ओतूनदेखील नाकावर टिच्चून काँग्रेस विजयी होईल, अशा प्रकारचे एकंदरीत चित्र आहे.
 
निवडणूक आयोग आणि भाजपावर आरोप

निवडणुका या निवडणुकांच्या पद्धतीने झालेल्या नाहीत. मतदार यादीतील घोळ, कॉलर पकडून उमेदवारांना माघार घ्यायला लावणे, पैसा आणि सत्तेच्या जोरावर पक्ष फोडायला लावणे या सगळ्या पार्श्वभूमिची किनार या निवडणुकांना आहे. मतदारांना खुलेआम पैसे देण्यात आल्याच्या घटनाही अनेक ठिकाणी घडल्या आहेत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर धनसत्ता जिंकते की जनशक्ती जिंकते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, मफ असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.