चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; पती पोलीस ठाण्यात झाला हजर

Foto
कन्नड, (प्रतिनिधी) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने लाकडी दांडक्याने डोक्यावर व चेहऱ्यावर वार करून तिची हत्या केली. गजानन कॉलनीत सोमवारी (दि. १२) पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

 रोहिणी मुकेश कुंभकर्ण (४४) असे  मृत महिलेचे नाव आहे.  मृत रोहिणी आणि मुकेश यांचा विवाह २००३ मध्ये झाला होता. मागील सहा-सात महिन्यांपासून मुकेश पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी वाद घालत होता. याबाबत रोहिणी यांनी माहेरच्या मंडळींना सांगितले होते. हे दाम्पत्य काही काळ छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास होते. ७ ऑक्टोबर रोजी ते कन्नडला परतले होते. रविवारी रात्री दांडिया खेळून घरी आल्यानंतर रोहिणी आणि मुकेश यांच्यात पहाटे चार वाजेच्या सुमारास पुन्हा वाद झाला. 

 त्यातून मुकेशने लाकडी दांडक्याने रोहिणीच्या डोक्यावर व चेहऱ्यावर वार केले. गंभीर दुखापतीमुळे तिचा मृत्यू झाला. दरम्यान, मुकेशने बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद केला. आणि दुचाकीवरुन पोलिस स्टेशन गाठले. त्याने पत्नीची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. हत्येनंतर पती मुकेश बाळकृष्ण कुंभकर्ण याने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची माहिती दिली. त्याला पोलिसांनी अटक केली.

उपविभागीय पोलीस अधिकारी आरती यांच्यासह पवार पथक घटनास्थळी पोहोचले. रोहिणी यांना दुचाकीने रुग्णालयात दाखल केले. डाँक्रांनी तपासून मृत घोषीत केले. रोहीणीचा भाऊ खींद्र रामदास घडमोडे यांच्या फिर्यादीवरुन मुकेश विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.