औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ९८ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या १४९९२ एवढी झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांपैकी ११२२९ जण बरे होऊन गेले आहेत. तर आतापर्यंत ४८७ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३२७६ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
ग्रामीण भागात ६२ रुग्ण आढळले
ग्रामीण भागात ६२रुग्ण आढळून आहे. बिल्डा, फुलंब्री-१, अडूळ, पैठण-१, सरकारी दवाखाना परिसर, वाळूज-१, बोरगाव -१, ताजनापूर, खुलताबाद-२, द्वारकानगरी, बजाजनगर-४, त्रिमूर्ती चौक, बजाजनगर-१, चिंचबन कॉलनी, बजाजनगर -१, गणोरी, पैठण-२२, रांजणगाव-१, नांदूर, पैठण-६, हतनूर, कन्नड-१, काळे कॉलनी, सिल्लोड -४, टिळकनगर, सिल्लोड -३, श्रीकृष्ण नगर, सिल्लोड-१, शास्त्रीनगर, सिल्लोड -१, देऊळगाव बाजार, सिल्लोड-१, स्नेहनगर, सिल्लोड -५, शिवाजी रोड, वैजापूर-३, वैजापूर -१, भाटिया गल्ली-१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.
शहरात आढळून आले ३६ रुग्ण
शहरात ३६ रुग्ण आढळून आले आहे. त्यात एमजीएम परिसर -१, नागेश्वरवाडी-१, खडकेश्वर -१, पुंडलिकनगर-३, जवाहर कॉलनी-३, एन नऊ, पवननगर-१, गुरूकृपा अपार्टमेंट, समर्थनगर -१, प्रकाशनगर-१, नंदनवन कॉलनी -५, पदमपुरा-२, जाधववाडी-१, एन दोन, रामनगर-३, अजबनगर-१, एन पाच, गुलमोहर कॉलनी -१, विनायकनगर, जवाहर कॉलनी -१, जयभवानीनगर-१, बालाजीनगर-१, एन सहा सिडको -१, पवननगर, हडको-१, सीटीटॉवर, आझाद कॉलेज परिसर -१, हडको परिसर -१, विजयनगर, गारखेडा परिसर-१, चिकलठाणा-३ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.