विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Foto
पैठण, (प्रतिनिधी) :  नवनिर्वाचित नगराध्यक्षा, नगरसेवक, नगरसेविका जिल्हा परिषद सदस्य, सदस्या पंचायत समिती सदस्य, सदस्या यांनी विजयाने हुरळून न जाता सर्वांना सोबत घेऊन जनतेची कामे करुन पक्षसंघटना बळकट करावी, पक्ष बदनाम होईल असे वागु नये
असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी केले.

तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते सत्कार, पैठण तालुक्यातील शिंदे शिवसेनेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांचा मुंबई येथे राज्याचे पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे, पैठणचे आमदार आमदार विलासबापु भुमरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पैठण नगर परिषद व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिंदे शिवसेनेने घवघवीत यश संपादित करुन विरोधकांचा सापडा सूप केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातुन निवडुन आलेल्या सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे सत्कार करण्यात आला. 

यावेळी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ, खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे प्रा. रमेश बोरणारे, जिल्हाप्रमुख रमेश पवार, नगराध्यक्षा विद्या भूषण कावसनकर, विनोद बोंबले, नंदलाल काळे, शिवराज भुमरे, जीत सिंग करकोटक, दिलीप जगताप, कृष्णा गिधाने, नितीन तांबे, दादा गलांडे, सोमनाथ परदेशी, नामदेव खरात, शेखर शिंदे, श्याम तांगडे, राजू वाघमोडे, सतीश आंधळे यांच्या सह जिल्ह्यातील शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.