बीड : विकास कामाला निधी कमी पडू देणार नाही. फक्त चांगल्या सवय लावा, पूरग्रस्त भागाला निधी उपलब्ध करून दिला. चांगल्यातल चांगलं करण्याचं ठरवलं आहे. राज्य सरकार पायभूत सुविधवर जास्त भर आहे. ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे. रेल्वेमधून समृद्धीचा नवा इतिहास रचला जाईल. दिलेला पैसा सत्कारणी लागला पाहिजे. सत्ता धरी विरोधक किंवा अधिकारी यांची गय केली जाणार नाही. बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा . जातीपातीचे राजकारण करू नका असे आवाहन उपमुख्यमंत्री ताठ बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्य साधून त्यांच्या हस्ते रेल्वेचा शुभारंभ झाला. या वेळी उद्घाटानंतर बोलताना ते म्हणाले की , बीड रेल्वेला इतका विलंब लागला, इतका वेळ लागयला नको होता, बीडकरांनी आत्मचिंतन करावं.. पालकमंत्री अजित पवारांचा बीडमध्ये नेत्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. बीड - अहिल्यानगर रेल्वे सेवेचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ झाला. अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर बीडमध्ये रेल्वे सेवा सुरू झाली आहे.
अजित पवार पुढे म्हणाले की , मराठवाड्याच्या रेल्वे इतिहासात हा सुवर्ण क्षण आहे. उद्घाटन झाले अन् तुम्ही असे चेकाळले की घोषणाबाजी करू लागत} यावरून कान उघडणी करताना ते म्हणाले की , जग कुठे चाललो आपण कुठे? माणुसकी दाखवा आपण. माणुसकी महत्वाची आहे. आम्ही जाती पातीचे राजकारण करायला आलो नाहीत, समाजचं हित पाहायचे आहे. मला वाईट वाटलं एवढे वर्ष का लागले..? एवढे खासदार झाले तेव्हा इथपर्यंत आली. नको तिथे राजकारण आणू नका. आम्ही भरभरून देणार आहोत. थोड्या थोड्या पैशा करता जी कामे थांबली ते सांगा आम्ही पैसे देतो.
बीडचा पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवणार : अजित पवार
बीडसाठी CIIIT सेंटर सुरू करत आहोत. दर वर्षी 7000 विद्यार्थी शिक्षण घेतील. लवकरच विमानतळ सुरू करत आहोत. 1000 एकर जगा कशी मिळते ते पाहा. नुसती भाषण करून चालत नाही, आम्ही बीन कामाची माणसं नाही कामाची माणसं आहेत.. नको तिथे राजकारण आणत नाही.आंबेजोगाईसाठी 1000 कोटी लागतील.रेल्वेचा वेळ कमी करणार आहे. पाण्याचा प्रश्न देखील सोडवणार आहे, असेही अजित पवार म्हणाले.