पैठण, (प्रतिनिधी): श्री क्षेत्र वडवाळी येथील श्री बालाजी मंदिराच्या विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही असे प्रतिपादन आमदार विलास भुमरे यांनी श्री बालाजी लळीत यात्रेच्या समारोप व विविध विकासकामाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
यापूर्वी आपण मंदिराच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे आता पुन्हा तीन कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दोन कोटीच्या निधीतून किचन शेड / भोजन कक्ष बांधकाम, स्वच्छतागृह बांधकाम व इतर अनुषंगिक कामे, सभागृह बांधकाम व इतर अनुषंगिक कामे, डोंब बांधकाम व इतर अनुषंगिक
कामे, पेविंग ब्लॉक व इतर अनुषंगिक कामे करण्यात येणार असून तीन कोटी मधून संरक्षण भिंत व सुशोभीकरण करण्यात येणार यामुळे या तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी नंदलाल काळे, विनोद बोंबले, आप्पासाहेब निर्मळ, रवींद्र काळे, अण्णासाहेब लबडे, भूषण कावसनकर, पोपट औटे, लक्ष्मण औटे, मनोज गायके, बळीराम औटे, सरपंच स्वाती किशोर काळे, श्याम काळे, अरुण काळे, डॉ. भरत झारगड, संतराम जाधव, उत्तम जाधव, शिवाजी गाडे, एकनाथ काळे, अशोक बर्डे, योगेश पाचे, आप्पासाहेब भोंडे, बजरंग काळे, शेषराव जाधव, स्वप्निल साळवे, सुनील वायभट, परसराम खोपडे, बालाजी नलभे, गणेश भोंडे, किशोर चौधरी, सखाराम शिंदे, सुदाम पाचे, रामदास काळे, यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.













