कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करायचा नाही ः अभिजीत दीपके

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) ः कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केल्यानंतर अभिजीत दीपकेने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हाक दिली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. एक मोठे आंदोलन उभे करून यशस्वी केल्याबद्दल अभिजीत दीपकेची सर्वत्र चर्चा सुरु आहे. पण, आता पुढे राजकारणात प्रवेश करणार आहे का आणि राजकीय नेत्यांबद्दल त्याचे मत काय आहे? याविषयी अभिजीतने त्यांची मते मांडत पुढचा प्लॅन सांगितला.

एका वृत्तवाहिनीला अभिजीत दीपकेने मुलाखत दिली. या मुलाखतीत तो वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलला आहे. मपुढील योजना काय आहे आणि तू राजकीय पक्ष स्थापन करणार आहेस का?फ, असा प्रश्न अभिजीत दीपकेला विचारण्यात आला होता.  या प्रश्नावर बोलताना अभिजीत म्हणाला, या आंदोलनातून मला ही गोष्ट समजली की, कोणताही राजकीय नेता जनतेचे म्हणणेच ऐकून घेत नाही. लोकांची सर्वात  
मोठी तक्रार हीच आहे की, त्यांचे म्हणणेच ऐकून घेतले जात नाही. त्यामुळे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचे आहे आणि समजून घ्यायचे आहे की, त्यांच्या मागण्या काय आहेत? त्यांच्या अपेक्षा काय आहे आणि त्यांना कोणत्या गोष्टींची चिंता आहे.

सध्या तरी तीन मुद्दे आहेत. एक शिक्षण, ज्याचा परिणाम संपूर्ण देशावर होत आहे. दुसरा बेरोजगारी आहे. आंदोलनात जे लोक होते, त्यातील बहुमतांश बेरोजगारीमुळे त्रस्त आहेत. आणि देशातील स्वायत्त संस्था आणि व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे अभिजीत म्हणाला. अभिजीत म्हणाला की, आम्ही कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाहीये. हा एक रिस्पॉन्स ग्रुप आहे, जो पुढील निवडणुकीपर्यंत वेगवेगळ्या मुद्द्यांवर काम करणार आहे आणि जनता आणि तरुणांच्या समस्यांवर आवाज उठवणार आहे.

एखाद्या नेत्याने ऑफर दिली का?
अभिजीत दीपकेची अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी घरी जाऊन भेट घेतली. तुला कोणत्या पक्षाच्या नेत्याने पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिलीये का? असा प्रश्न विचारण्यात आला. अभिजीत म्हणाला की, ङ्गङ्घनाही. कोणत्याही राजकीय पक्षाकडून प्रवेश करण्याची ऑफर आलेली नाही. जे लोक येत आहेत, ते फक्त अभिनंदन करण्यासाठी येत आहेत. आम्ही चांगले काम केले आहे आणि विद्यार्थ्यांना न्याय दिला म्हणून कौतुक करत आहेङ्घङ्घ, असे अभिजीत म्हणाला आहे.