मुंबई: राज्यसभा निवडणूक बिनविरोध होताच विधान परिषदेला विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंची जागा रिक्त झाल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद खाली होणार आहे. या विरोधी पक्षनेते पदावरती काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपची विरोधी पक्षनेते पदासंदर्भात नवीन खेळी समोर आली आहे. मे महिन्यात ९ विधान परिषदेच्या जागा रिक्त होणार आहेत. भाजपच्या ४, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाची प्रत्येकी १ जागा रिक्त होणार आहे.
राज्यसभेच्या जागेवरुन विरोधी पक्षनेतेपदाचे भवितव्य ठरणार?
विधान परिषदेसाठी २९ मतांचा कोटा असणार आहे. अशात, महायुतीच्या वाट्याला ८ जागा येणार, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला १ जागा येणार आहे. अशात, राज्यसभेच्या जागेवरुन विरोधी पक्षनेतेपदाचे भवितव्य ठरणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. विधान परिषदेत काँग्रेसकडे ६, शिवसेनेकडे ६ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाकडे ३ जागा आहेत.
काँग्रेसच्या सतेज पाटलांच्या नावावर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता
राज्यसभा निवडणुकीवर विरोधी पक्ष नेत्याची वाटचाल किंवा भवितव्य असल्याचं दिसून येत आहे. राज्यसभा निवडणुकीबद्दल पाहायचं झालं तर सहा जागा या महायुती आणि एक जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे, एकूणच ही भाजपची खेळी म्हणावं लागणार आहे, अंबादास दानवे यांची जागा रिक्त झाल्यानंतर विरोधी पक्षनेते पद खाली झाल्यानंतर त्या जागी काँग्रेसच्या सतेज पाटलांच्या नावावर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता आहे. मे महिन्यामध्ये जर या नऊ विधानपरिषदच्या जागा रिक्त होणार आहेत, त्यामध्ये आता भाजपच्या चार जागा आहेत,
काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या प्रत्येकी एक जागा आहेत. एकूण 29 मतांचा हा कोटा आपल्याला पाहायला मिळतो. महायुतीच्या वाट्याला एकूण आठ जागा मिळताना दिसतात आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा जाताना दिसत आहे. या परिस्थितीमध्ये भाजपाकडून एक खेळी खेळली जात आहे. राज्यसभेची जागा आणि राज्यसभेची एकूणच निवडणूक बिनविरोध झाली तर भाजपकडून किंवा महायुतीकडून या जागा संदर्भात विचार होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने राज्यात राज्यसभेवरून विरोधी पक्ष नेते पदाचा पद ठरताना दिसणार आहे.