मनपा निवडणूक लांबणार? महापौर घोडेलेंची मागणी

Foto
औरंगाबाद : एप्रिल महिन्यात होणार्‍या महानगरपालिकेच्या सावत्रिक निवडझुका सहा महिने पुढे ढकलल्या जाणार आहेत. जगभरात सध्या कोरोना आजाराने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने यापूर्वी एमआयएमने निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. आज महापौर नंदकुमार घोडेले यांनीही अशी मागणी केली आहे. तर यापूर्वीच सेनेच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्याची मागणी केलेली आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक सहमती दर्शविली असल्याने निवडणुका सहा महिने लांबल्यास आश्‍चर्य करायला नको, असे पश्‍चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांनी सांजवार्ताशी बोलताना सांगितले.
सध्या जगभरात कोरोना आजाराचे संकट पसरले आहे. भारतातही काही रुग्ण आढळत आहेत. या पार्श्‍वभूमीवर निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील यांनी केली होती.  त्यानंतर आज महापौर नंदकुमार घोडेले यांनीही निवडणुका पुढे ढकलण्याबाबत भूमिका जाहीर केली आहे. तसेच याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचेही ते म्हणाले. सध्या कोरोना आजाराचेनिमित्त करून सहा महिने मुदत वाढ मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत आ. संजय शिरसाट यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती व निवडणुका पुढे ढकलण्याबाबत चर्चा केली होती. त्यावेळी ठाकरे यांनी सकारात्मक चर्चा केली होती. त्यामुळे निवडणुका लांबल्यास आश्‍चर्य व्यक्‍त  करायला नको, असे आ. शिरसाट म्हणाले.  दरम्यान, मनपा निवडणुका वेळेवर घेण्यात याव्यात, कोरोना आजाराचे निमित्त करून निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट काही जण घालत आहे. प्रशासनानीे कोरोना बाबत योग्य ती खबरदारी घ्यावी व मनपा निवडणुका ठरल्या वेळीच घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेवराव पवार यांनी केली आहे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker