साजापूर येथे महिलेस मारहाण; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Foto
वाळूज महानगर, (प्रतिनिधी) : एका २८ वर्षीय तरुणास तिच्याच ओळखीच्या इसमाने दुकानात घुसून मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना साजापूर मंगळवारी (दि.२६) सायंकाळी घडली.

पीडित तरुणीचे साजापूर येथे शिलाई मशिन टेलरिंगचे दुकान आहे. मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तरुणी दुकानात काम करत असताना, तिच्या ओळखीचा अनिस इस्माईल शेख हा दुकानात येत मागील पाच वर्षांपासून संबंध असल्याच्या कारणावरून वाद घालत होता. तिचा हात पकडून दुकानातून बाहेर काढत सर्वांसमोर मारहाण केली. 

तसेच मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. एवढेच नव्हे तर तिच्यासोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची व जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफौ तात्याराव शिंदे करत आहे.