छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : रस्त्यावरील कुत्र्याला बिस्किट टाकल्याच्या किरकोळ कारणावरून एका महिलेचा विनयभंग करत मारहाण केल्याची घटना ज्योतीनगर परिसरात घडली. या प्रकरणी अनिल मुळे (रा. ज्योतीनगर) याच्याविरुद्ध उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सुविस्वरूप हॉलमागे पीडित महिला दुचाकीवरून जात
असताना कुत्रे मागे लागले. म्हणून तिने कुत्र्याला बिस्किट टाकले. याचा राग धरून आरोपी अनिल मुळे याने शिवीगाळ करत महिलेला मारहाण केली आणि तिचा ड्रेस ओढून विनयभंग केला. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या महिलेच्या भावालाही आरोपीने मारहाण करून मी कार्यकर्ता आहे, काय करायचे ते कर अशी धमकी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक बोधनकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions












