मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मिनी गंठण हिसकावले

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिडको महानगर-१ परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ५४ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून दोन अज्ञात चोरटे फरार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लता प्रभु भालेकर (वय ५४, रा. सिडको महानगर-१) या २८ जुलै रोजी सकाळी वाजता सिडको महानगर-१ येथील जिजाऊ चौक परिसरातून सिडको पाण्याच्या टाकीकडे मॉर्निंग वॉकसाठी जात होत्या. पाण्याच्या टाकीच्या मागील बाजूस मोमोज कॉर्नरजवळ दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे १ लाख ४४ हजार रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची नावे व पत्ता अद्याप समोर आलेला नाही. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील करीत असून, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे फिरवण्यात येत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions