महिला शेतकरी प्रमाणपत्र वाटप अभियान, शिबिरामध्ये पुरवणार सेवा

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) महिला शेतकरी प्रमाणपत्र वाटपः ४५० महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. घरगुती विद्युत जोडणीः महावितरणच्या माध्यमातून ४०९ प्रलंबित घरगुती विद्युत जोडण्यांना मंजुरी देण्यात आली.


जात व उत्पन्नविषयक दाखलेः २१४ नागरिकांना विमुक्त जाती व भटक्या जमाती जात प्रमाणपत्रे तसेच ६४ नागरिकांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. आधार व ओळखपत्र सेवाः ५६ नागरिकांना आधार कार्ड सेवा देण्यात आल्या. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक कल्याणः ३५ लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्रे तर एका ज्येष्ठ नागरिकास ओळखपत्र प्रदान करण्यात आले. 

महसूल व भूमी अभिलेख कामकाजः १९ प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा करण्यात आला, ७ खातेदारांच्या ७/१२ व ८-अ नोंदी अद्ययावत करण्यात आल्या, तसेच २१ मालमत्ता हस्तांतरण नोंदी घेण्यात आल्या.

पाणंद रस्ते विकासः मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत ५ कामांना गती देण्यात आली. इतर नागरी सेवाः ८ कुटुंबांना शिधापत्रिकांचे वितरण, १४ जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्रे, ५ विवाह नोंदणी प्रमाणपत्रे, ४ महिला बचत गटांची नोंदणी आणि मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीत नाव नोंदविण्याचे ११ प्रकरणे पूर्ण करण्यात आले.

 तालुक्यात शिबिरांचे नियोजन करून नागरिकांचे प्रशासकीय प्रश्न निकाली काढण्यात आले असून शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविण्याचा हा सेवा संकल्प अभियान उपक्रम यशस्वी ठरला आहे, अशी माहिती तहसिलदार सागर वाघमारे यांनी दिली.