पैठण, (प्रतिनिधी): पैठण तालुक्यातील व शहरातील सर्व समाज घटकाला सोबत घेऊन खा. संदीपान भुमरे व मी काम केले आहे. कधीच जात म्हणून काम केले नाही, माणूस म्हणून आम्ही भुमरे परिवाराने काम करण्याला प्राधान्य दिल्याचे प्रतिपादन आमदार विलास भुमरे यांनी व्यक्त केले.
शहरातील महात्मा बसवेश्वर चौक स्तंभाच्या सुशोभीकरण कामांचा शुभारंभ व भूमिपूजन सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर भुषण कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, सपोनि ईश्वर जगदाळे, प्रा. संतोष गव्हाणे, माजी नगराध्यक्ष जितसिंग करकोटक, राजू गायकवाड, संत एकनाचे माजी चेअरमन अंकुश रंधे शेखर शिंदे, जालिंदर आडसुळ, बाळु माने, बादशाह परळकर, सतीश अंधाळे, अजित पगारे, वसंत ताकटे, कुणाल खताडे, दिलीप कबाडे, सचिन गुरुकले. रघुनाथ इछैय्या, पुष्पा गव्हाणे ज्योती काकडे, प्रशांत जगदाळे, अनिकेत धारकर आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार भुमरे म्हणाले, आपण सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकासकामे करत आहोत. जात पात न पाहता माणूस म्हणून काम करण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यांनी पुढे सांगितले की, शहरात महापुरुषांचे पुतळे उभारल्याने नागरिकांना प्रेरणा मिळते आणि उद्यान विकासालाही चालना मिळेल. तसेच उपजिल्हा रुग्णालय व संत पीठ कधीही बंद होणार नाही, यासाठी कटिबद्ध असून त्यांच्या विकासासाठी ३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक तसेच विविध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.












