१३० डॉक्टरांचा सहभाग
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. यादरम्यान योग्य आहारविहार आणि पुरेशी झोप होत नसल्याने अनेक व्याधी जडतात. निरोगी जीवनशैलीमध्ये पुरेशी व द गुणवत्तापूर्ण झोप महत्त्वाची असून, या झोपेचे विकार ओळखून योग्यवेळी निदान व उपचार करणे आवश्यक क्ष आह. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसह न्त डॉक्टरांनी झोपेशी संबंधित आधुनिक ग संशोधन व उपचारपद्धतींची माहिती चे आत्मसात करण्याचे आवाहन घाटीचे क अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी केले.
T. क्ष ,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बर व रुग्णालय येथील शरीरक्रियाशास्त्र न. विभागाच्या वतीने डिकोडिंग स्लीप न्य विषयावर सातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम (सीएमई) आयोजित
SLEEP
करण्यात आला. या सीएमईचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते झाले. शरीरक्रियाशास्त्र विभागप्रमुख डॉ. अंजली शेटे, डॉ. तृप्ती बोरुळकर, डॉ. श्रीकांत पापीनवार, डॉ. अतुल पोरे, डॉ. रितेश भाग्यवंत, डॉ. प्रदीप देशमुख, डॉ मंगलमुर्ती चौधरी आदींनी तज्ञांनी या विषयावर माहिती दिली. कार्यक्रमासाठी उपअधिष्ठाता डॉ. विनोद मुदंडा, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेश हरबडे, महाराष्ट्र मेडिकल
कौन्सिलचे निरीक्षक डॉ. मनीष मालानी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विभागातील आर्गनायझिंग सेक्रेटरी डॉ. नंदा सोमवंशी व उपाधिष्ठाता डॉ. काशीनाथ गर्कळ तसेच या कार्यक्रमाला डॉ. सुरवसे, डॉ. डांगे, डॉ. अश्फाक, डॉ. मुनीब, डॉ. रूपा आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. स्मिता बुटे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. प्रतिभा कलवले यांनी केले.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions















