व्वा रे बहाद्दर...कुल्फीची गाडी दुचाकीला बांधली

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) ः कुल्फीची गाडी आणि भले मोठे डीफ्रिज दुचाकीला बांधून नेणार्‍या चोरट्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही घटना ११ मार्च रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास गजबजलेल्या रिलायन्स मॉल गजानन कॉलनी परिसरात उघडकीस आली. 
याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निल बबनराव शिर्के रा. गुरूदत्त नगर गट नं. ३ असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शुभम हेमंत देवकर रा. गजानन नगर यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार ११ मार्च रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास आरोपीने फिर्यादींची बासुरी गुळाची कुल्फी नावाची कुल्फीची गाडी व त्यावर असलेले डीप फ्रिज दुचाकीला बांधून चोरण्याचा प्रयत्न केला. याबाबत माहिती मिळताच फिर्यादींनी पोलिसांना कळविले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता चोरट्याची करामत उघडकीस आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोह राठोड हे करीत आहेत.