गणेश महासंघाच्या आखाड्यात मल्लांची चुरस

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): जिल्हा गणेश महासंघाच्या वतीने रविवारी जि.प. मैदानावर कुस्त्यांचा आखाडा रंगला. मराठवाड्यातील नव्हे तर राज्यभरातून आलेल्या मल्लांनी यावर्षीचा आखाडा चांगलाच गाजवला. प्रतिस्पर्धी पैलवानाला चित्त करण्यासाठी एकमेकांवर मात करत, रंगलेले डावपेच अन् मल्लांच्या सहभागाने चांगलीच रंगत आली.
औरंगपुरा येथील जि. प. मैदानावर महासंघाच्या कुस्त्यांच्या दंगलचे उद्घाटन मनपा सभापती अनिल मकरीये यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष हरिभाऊ
हिवाळे पाटील, मुख्य मार्गदर्शक डॉ. हंसराज डोंगरे, संतोष जेजुरकर यांची उपस्थिती होती. अकरा हजार रुपयांपर्यंतची
पारितोषिके ठेवण्यात आली. चाळीसगाव, हसूल, बेगमपुरा, आष्टी (जि. बीड), चिकलठाणा, देवळाई यासह जिल्ह्यातील कुस्तीपटुंनी कुस्तीच्या आखाड्यात एकमेकांना चितपट करत आखाडा रंगवला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गणेश महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र दाते पाटील, संदिप शेळके आदींनी परिश्रम घेतले. पंच कमिटीचे मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. हंसराज डोंगरे, अॅड. सेवकचंद बाखरीया, पैलवान ज्ञानेश्वर जाधव, विनायक पांडे, धीरज सिद्ध, चेतन जांगडे, सुरेश पवार, तर पंच कमिटी म्हणून मंगेश डोंगरे, रामेश्वर विधाते, निलेश जांगडे, अनिल मालकर, सुनील बागवाले, प्रवीण कडपे आदींचे सहकार्य लाभले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions