आपण कुठल्याही पक्षाच्या संपर्कात नाही; कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये - राजेश टोपे

Foto
जालना: राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठमोठे नेते पक्ष सोडून जात असताना पक्षाला लागलेली गळती काही केल्या थांबायचे नाव घेत नाहीये. मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवसेनेत दाखल झाल्यानंतर आणखी अनेक नेते सेना-भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. या नावामध्ये आता जालना जिल्हातील राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांचे नावदेखील जोडले गेले आहे. राजेश टोपे हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्च्या समाज माध्यमवर आहेत. मात्र,  टोपे यांनी या वृत्ताचे खंडन केले असून आपण कुठल्याही पक्षाच्या संपर्कात नसल्याचे म्हटले आहे.  

जालन्यातील अंबड-घनसावंगी मतदारसंघाचे आमदार व माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांवरून प्रसिद्ध झाल्या होत्या. टोपे यांना त्यांच्या मतदारसंघात सेनेच्या हिकमत उढाण यांचे मोठे आव्हान आहे. टोपे यांचा मजबूत गड असलेला अंबड मतदारसंघ यावेळी धोक्यात असल्याची चर्चा आहे. यामुळेच ते लवकरच सेनेत प्रवेश करतील असा तर्क लावला जात होता. टोपे यांनी मात्र या बातमीचे खंडन केले असून आपण कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही. कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे म्हटले आहे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker