ब्रेन डेडनंतर तुंगार कुटुंबाचा धाडसी निर्णय
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : सोशल मीडियावर आपल्या खास शैलीने २ लाखांहून अधिक युझर्सना जोडणारे प्रसिद्ध युट्यूबर तेजस सुधाकर तुंगार (वय ४३) यांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर डॉक्टरांनी 'ब्रेन डेड' घोषित केले. दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही त्यांच्या पत्नी, आई आणि वडिलांनी दाखवलेल्या अथांग धैर्यामुळे चौघांच्या आयुष्यात नवा प्रकाश आला आहे. तुंगार कुटुंबाने घेतलेल्या अवयवदानाच्या धाडसी आणि संवेदनशील निर्णयामुळे
दोन रुग्णांना नवसंजीवनी मिळाली असून, इतर दोघांना दृष्टी मिळणार आहे. तेजस हे महाप्रपंचसह विविध यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून विविध विषयांवर खास शैलीतून मत मांडत, विश्लेषण करत. तसेच नाट्यकलावंत, लेखक, आरजे असाही त्यांचा प्रवास राहिला. ब्रेन हॅमरेजने त्यांच्या आयुष्याचा प्रवास थांबला. उपचारादरम्यान त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. या क्षणी कुटुंबीयांनी या
दुःखातही त्यांच्या पत्नी आणि आईने अवयवदानाचा निर्णय घेतला. मंगळवारी मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये त्यांचे रिट्रायव्हल करण्यात आले. त्यातील एक किडनी शहरातील खासगी रुग्णालयात प्रत्यारोपण करण्यात आली. दुसरी किडनी नांदेड येथे गरजू रुग्णासाठी पाठविण्यात आली. त्यांचे नेत्रदानही करण्यात आले. तेजस यांचे हृदय थांबले, मात्र त्यांच्या अवयवांमधून काही इतर दोघांना जीवदान तर दोघांना दृष्टी मिळाली आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














