तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) तालुक्यातील लासूर स्टेशन येथे स्वतः च्या शेतातील विहिरीत उडी घेऊन शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना लासूर स्टेशन येथे शनिवारी उघडकीस आली. गणेश ऊर्फ बाळू मोहनराव खंडागळे (वय ४२) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

गणेश खंडागळे हे शुक्रवारी (दि. ३) सकाळी शेतात कामासाठी गेले होते. मात्र, संध्याकाळपर्यंत ते घरी परतले नाही. कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत काहीही पत्ता लागला नाही. रात्री ११:३० वाजता तालुक्यातील शिल्लेगाव ठाण्यात ते हरवल्याची तक्रार नोंदवली. शोध मोहीम दरम्यान रविवारी सकाळी त्यांच्या अंत्यपूर शिवारातील गट क्र. १५८ मधील शेतातील विहिरीजवळ त्यांचे चप्पल आढळून आल्याने संशय बळावला. शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. उत्तरीय तपासणीसाठी तो लासूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी १२:३० दुपारा वाजता लासूर स्टेशन येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. त्यांच्या पश्चात वडील, आजी, पत्नी, दोन लहान मुले, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. लासुर स्टेशन येथे परिसरामध्ये हळूहळू होत आहे.